ओएनजीसीला अरबी समुद्रात मुंबई हायच्या पश्चिमेस मोठा साठा सापडला आहे. तेलाचा शोध घेण्यासाठी ९ ठिकाणी चाचपणी केली जात होती. नवीन साठ्यामध्ये २९.७४ मिलियन टन तेल आणि नैसर्गिक वायूचा साठा आहे. समुद्रात पाण्याखाली अनेक पातळ्यांमध्ये हा साठा दडलेला आहे. मुंबई हायच्या पश्चिमेस हा नवीन साठा आहे. मुंबई हाय हे ओएनजीसी चं सर्वात मोठं तेल उत्खनन क्षेत्र आहे.
या नवीन साठ्यामुळे ओएनजीसीला आपला तेल पुरवठा पुढची अनेक वर्षं करता येणार आहे. ओएनजीसीने मागच्या वर्षी २५.५ मिलियन टन तेलाचं उत्पादन केलं. पुढील वर्षी ते २८-२९ मिलियन टनापर्यत जाईल.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews